रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱयांचा स्वच्छतेचा धडाका !

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मा. सुनिल चव्हाण साहेब आपल्या कर्तृत्वाने खरंच रत्नागिरीकरांच्या मनाचे “राजे’ ठरले आहेत. सुत्रे स्विकारल्यानंतर त्यांनी शहरात साफ सफाई मोहिम आणि सरप्राईज व्हिजीट मोहीम राबविली.

त्याचे उदाहरण म्हणजे आज जेव्हा

त्यांनी “हर्षा स्कूबा डाइव्हिंग”ला अचानक भेट दिली. तेव्हा ते मिऱ्या येथील वाघवळीच्या बीच ची पण पाहणी केली. त्यावेळी तिथे प्लास्टीक आणि दारुच्या बाटल्यांचा खच बघुन नुसती नाराजी व्यक्त न करत बसता स्वत: सफाई करण्यासाठी पुढे सरसावले.

त्यांनी प्रत्यक्षात हे सिद्ध केले कि ह्या कार्यक्रमासाठी वेगळी वेळ द्यावी लागत नाही. प्रत्येकाने आपल्या वेळेचा उपयोग करण्याचे ठरवले तर आपली रत्नागिरी नक्कीच स्वच्छ राहील.

त्यानंतर त्यांनी स्कूबा डाइव्हिंगचा आनंद लुटला आणि सर्वाना मनापासून शुभेच्छा दिल्या.

Scuba Diving Ratnagiri – See Packages